माघारी परतणाऱयांची संख्या अधिक : नाक्यावर कडक तपासणी
प्रतिनिधी / बांदा:
गोव्यात शुक्रवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने गोव्यातून ई पासने माघारी परतणाऱयांची मोठी संख्या दिसून आली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक बंद असल्याने बांदा-सटमटवाडी सीमा तपासणी नाक्यावर शुकशुकाट आहे. तर गोवा पोलिसांकडून सक्षम कारण असल्यासच गोव्यात प्रवेश दिला जात होता. गोवा पोलिसांकडून कडक तपासणी होत होती.
शुक्रवारपासून चार दिवस गोवा राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ तुरळक होती. गोवा-पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यात प्रवेश करणाऱया वाहनांची तपासणी करून सक्षम कारण असल्यास केवळ नोंदणी करून प्रवेश देण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातून दररोज गोव्यात ये-जा करणाऱया नोकरदारांना कोणतीही आडकाठी करण्यात आली नसल्याने तरुणांमधून समाधान व्यक्त होत आहे. बांदा-सटमटवाडी येथे सीमा तपासणी नाक्यावर शुक्रवारी वाहनांची तुरळक नोंद करण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत तपासणी नाक्यावरील कर्मचाऱयांना बऱयाच दिवसानंतर आराम मिळाला. अत्यावश्यक सेवेची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती. ata/tigor-ev