बेळगाव / प्रतिनिधी
मंगळागौर म्हणजे उत्साहाचा दिवस. सकाळी पूजा, संध्याकाळी हळदीकुंकू आणि नंतर मंगळागौरीचे खेळ खेळून शहापूर येथील कचेरी गल्लीतील अवधूत अपार्टमेंटमध्ये सखी गटाच्यावतीने गुरुवारी मंगळागौर साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी झिम्मा फुगडी पिंगा नाच ग घुमा या गाण्यावर नृत्य सादर करून अनेक खेळांचा आनंद घेतला.
यावेळी मंगळागौरनिमित्त विविध गाणी सादर करून महिलांनी फेर धरला. त्याचबरोबर फुगडी, बसफुगडी, तवा फुगडी याशिवाय बरेच खेळ, नृत्य सादर केले. यावेळी सखी गट समूहाच्या महिलांनी मंगळागौर खेळाचे आयोजन करून आनंद लुटला.
यावेळी श्रद्धा पाटील, प्रतिभा पाटील, प्रियांका सूर्यवंशी, माधुरी बोंदे, स्वाती फडके, स्नेहल पाटील, ऐश्वर्या पाटील, सिमरन फडके, श्रावणी पाटील, माधुरी बांदिवडेकर, वर्षा गजन्नावर, प्रिया संकलन्नावर यासह महिला उपस्थित होत्या.