ऑनलाईन टीम / मुंबई :
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवल्या प्रकरणी आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएनकडून सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर वाझेला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले असून सध्या सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र या कारवाईदरम्यान सचिन वाझेंना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने, सचिन वाझेकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आता न्यायालयाने सचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, सचिन वाझेच्या ह्रदयात 3 ब्लॉक आहेत. जे 90 टक्केहून अधिक आहेत. त्यामुळे सचिन वाझेच्या वकिलांनी कोकीळाबेन, सुराना किंवा सैफी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी अशी न्यायालयाकडे विनंती केली होती. त्यानंतर आता त्यांना सुराना रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. उपचारानंतर 15 दिवसात काय उपचार करण्यात आले, त्याची कागदपत्र जमा करण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले आहेत.