वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने आपल्या पसंतीनुसार जगातील सर्वोत्तम सात फलंदाजांची यादी तयार केली असून यामध्ये भारताच्या सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा समावेश केला आहे.
माजी कर्णधार मायकेल क्लार्कने आपल्या क्रिकेटच्या कालावधीत खेळणाऱया जगातील सर्वोत्तम सात फलंदाजांची यादी तयार केली. या यादीत सचिन तेंडुलकर, विराट कोहली, विंडीजचा ब्रायन लारा, दक्षिण आफ्रिकेचे एबी डिव्हिलीयर्स आणि पॅलीस, ऑस्ट्रेलियाचा पाँटोग आणि लंकेचा कुमार संगकारा यांचा समावेश आहे. तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 200 कसोटी, 463 वनडे सामने खेळले आहेत. सचिन हा जगातील माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाज असल्याचे क्लार्कने म्हटले आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचेशतक नोंदविले आहे, असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. 39 वर्षीय क्लार्कने 115 कसोटी, 245 वनडे आणि 34 टी-20 सामने खेळले असून त्याने कसोटीत 28 शतकांसह 8643 धावा तर वनडेत 8 शतकांसह 7981 धावा जमविल्या आहेत.