शाहूपुरी / वार्ताहर :
सज्जनगड, ता.सातारा येथील समर्थ समाधी मंदिरासह सर्व मंदिरे खुली करण्यात आली असून, निवास व्यवस्थाही दि.1 डिसेंबर पासूनसुरु होणार असल्याची माहिती श्री रामदास संस्थानचे अध्यक्ष सू. ग. स्वामी यांनी पत्रकाव्दारे दिली.
सज्जनगडावर प्रवेशापूर्वी कोरोना संबंधित विहित नमुन्यातील अर्ज www.ramdaswami.org या वेबसाईटवर भरुन द्यावा. निवासासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र अर्ज, येण्याआधी किमान 5 दिवस अर्ज 9423034112 या व्हॉटसॲप क्रमांकावर दाखल करणे, 65 वरील व्यक्तींना तसेच वय वर्षे 10 च्या खालील मुलांना मनाई करण्यात आली आहे. दुपारी भोजन प्रसादची व्यवस्था द्रोणामध्ये खिचडी आणि खीर बुफे पध्दतीने देण्यात येणार आहे.तसेच बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांना सायं. 5 नंतर प्रवेश बंदी राहणार असून, भक्तांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.