प्रतिनिधी/ सातारा
दीवाळी सणानिमित्त सध्या विविध वस्तुंची मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत आहे. यातच स्मार्टफोनची मागणी ही अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बाजार पेठेत विविध प्रकारचे अत्याधुनीक स्मार्टफोन ग्राहकांना सध्या आकर्षित करीत आहेत. प्रत्येक स्मार्टफोनची किंमती या त्याच्या फिचर (गुणवत्ते) नुसार ठरत आहेत. अधिक फिचर असलेले स्मार्ट फोन हे अधिक किंमतीने विकले जात आहेत.
त्यातच सध्या ऑनलाईन शिक्षण पध्दती ही सुरूच आहेत. त्यामुळे कित्तेक पालकांनी आपल्या मुलांना स्मार्टफोन खरेदी करण्या करीता दीवाळी सणाचा मुहुर्त शोधला आहे. त्यामुळेच किंमतीत जरी वाढ असली तरी सध्या अन्न, पाणी, निवारा बरोबरच मोबाईल फोन ही काळाची गरज बनली आहे. अगदी सकाळ पासुनच शहरातील विविध मोबाईल विक्रीच्या दुकानांमध्ये दीपावली सणाचे औचित्य साधुन खरेदी करीता ग्राहकांची एकच गर्दी पहावयास मिळत आहे.
यातच ग्राहकांना आकर्षित करण्याकरीता विविध ऑफर्स ही ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मोबाईल सोबत हेड फोन, विविध गिफ्टचे स्क्रॅच कार्ड, लकी ड्रॉ सारख्या स्किम राबविण्यात येत आहेत. तसेच ग्राहक आपल्या कडून निघून जाऊनये याकरीता इनस्टॉलमेंटवर मोबाईल देण्याची सुविधा ही अनेक विक्रेत्यांकडून राबविण्यात येत आहे.
मागील वर्षी पेक्षा यंदा मागणी अधिक
मोबाईल बरोबरच सध्या लॅपटॉपची मागणी ही अधिक आहे. मागील वर्षी कोरोना आणि लॉकडाऊन मुळे व्यवसाय हा ठप्प होता. पण यंदा मात्र बाजारपेठा पुन्हा पुर्वीप्रमाणे सुरळीत झाल्याने व्यवसायाला गती मिळाली आहे. सध्या गेमिंग प्रोसेजर असणाऱया मोबाईलला व वायरलेस ब्लुटुथ ला अधिक पसंती देण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्राहकांना मोबाईल खरेदिवर विविध ऑफर्स ही देण्यात येत आहेत.