कोल्हापूर चेंबरची नामदार मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
सणासुदीच्या काळात सर्व व्यापारी आस्थापने उघडण्याची परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इडस्ट्रीज व सर्व सलंग्न व्यापारी संघटनांच्यावतीने सोमवारी नामदार. हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
आज गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त आहे. या मुहूर्तावर सोने-चांदी, कपडे व इलेक्ट्रॉनीक वस्तू, मोबाईल आदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. पण बंदमुळे मागील वर्षीही व्यापाऱयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यावर्षी हे नुकसान होऊ नये यासाठी दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
व्यापाऱयानां जीएसटीचे एप्रिल महिन्यातील 10 तारखेला मासिक रिटर्न व त्रैमासिक रिटर्न भरण्याची मुदतही 20 तारखेला आहे. जर जीएसटीचे रिटर्न वेळेवर भरले नाही तर, सदर रिटर्नचे दंड व व्याज याचा फटका व्यापाऱ़्यांना बसणार आहे. त्याचप्रमाणे बँकेचे व्याज व हप्ते हे वेळोवेळी भरावे लागणर आहे. व्यापारी वर्गाचे कामगार पगार, हॉटेल भाडे, लाईट बील, पाणी बील या गोष्टींचा खर्च चालूच आहे. यामुळे व्यापाऱयांची आर्थिक व मानसिक स्थिती कमकुवत होत आहे. याचा विचार करून, अत्यावश्यक व जीवनावश्यक प्रमाणे सर्व व्यापारी आस्थापने उघडणेसाठी परवानगी मिळावी.अशी कोल्हापूर चेंबरची मागणी आहे.
यावेळी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, राजू पाटील, प्रदीपभाई कापडीया,प्रशांत शिदे, राहूल नष्टे, अजित कोठारी, संपत पाटील, संभाजी पोवार, कुलदीप गायकवाड, उपस्थित होते.