नवी दिल्ली
देशामध्ये गेले काही दिवस सणासुदीचा कालावधी सुरु राहिला होता, याच कालावधीत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जवळपास 65 हजार कोटी रुपयाची विक्री झाली आहे. मागील आर्थिक वर्षातील सणासुदीच्या कालावधीच्या तुलनेत 23 टक्के विक्री अधिक राहिली आहे. सदरची माहिती सल्लागार कंपनी रेडसीर यांनी आपल्या अहवालामध्ये दिली आहे.
नवीन मॉडेल सादरीकरण आणि सहज आर्थिक पर्यायांमुळे मोबाईल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक विक्री झाली असून यामध्ये सर्व वर्गवारीतील लोकांचा सहभाग राहिला असल्याचेही रेडसीर यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. सर्वच वयोगटातील लोकांनी ऑनलाइन खरेदीवर उत्सवी काळात भर दिल्याचे दिसून आले आहे.
कोरोना संसर्गातून सावरताना
कोरोनाच्या संसर्गातून व लॉकडाऊनमधून खूप महिन्यांच्या कालावधीनंतर लोक प्रत्यक्ष खरेदीसाठी बाहेर पडले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विक्रीचा ओघ वाढताच राहिला असल्याचे दिसले आहे.