प्रतिनिधी / शिरोळ
सततच्या आजारास कंटाळून गणेश विजय सुतार (वय 34 रा. बेघर वसाहत, शिरोळ) या तरुणाने आत्महत्या केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरोळ ते कुरुंदवाड या जुन्या रस्त्यावरील पुलानजीक असलेल्या ओढ्यात महापुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आले आहे. या ओढ्यात आलेल्या पाण्यात त्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. सदरची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश सुतार याला लकवा मारला होता. तसेच त्याला अन्य आजाराने ग्रासले होते. या आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. सदर घटनेची वर्दी त्याची बहीण रुपाली सचिन सुतार यांनी पोलिसांत दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.