जनजीवन विस्कळीत, रस्त्यावर पाणी
प्रतिनिधी /वाळपई
परतीच्या पावसाने सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागाला झोडपून काढले. जवळपास दोन तास जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागातील रस्त्यावर पाणी भरल्याचे चित्र पहावयास मिळाले .वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडला. दरम्यान या पावसामुळे भात उत्पादकामध्ये अस्वस्थता पसरली असून पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास भातशेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्मयता आहे.
रविवार सकाळपासून हवामानात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. यामुळे संध्याकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज वर्तविण्यात येत होता .संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गडगडाट व वाऱया वादळासह पावसाचे जोरदार आगमन झाले. जवळपास दीड तास पावसाने अक्षरशः सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागाला झोडपून काढले . वादळी वारा व मोठय़ा प्रमाणात गडगडाट यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .मात्र 5.30 वाजण्याच्या सुमारास पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सत्तरी तालुक्मयाच्या ठाणे, नगरगाव, म्हाऊस पंचायत क्षेत्राला जास्त प्रमाणात फटका बसल्याची माहिती आलेली आहे. त्याप्रमाणे घाटमाथ्यावरील प्रचंड प्रमाणात पाऊस पडला.. यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये काही प्रमाण वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
वाळपई शहरात मोठय़ा प्रमाणात पाऊस लागल्यामुळे वाळपई- होंडा दरम्यानच्या वन प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या समोर मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा बनला होता .त्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सातत्याने पाणी भरत असते .रविवारी लागलेल्या पावसामुळे अशाच प्रकारे वाहतूक ठप्प होण्याची घटना घडली .यामुळे दोन्ही बाजुनी मोठय़ा प्रमाणावर वाहने अडकून पडली होती. जवळपास अर्ध्या तासाने पाणी ओसरल्यानंतर ही वाहतूक सुरू झाली .मात्र याठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे .
दरम्यान ठाणे चरावणे हिवरे नगरगाव वाळपई आदी भागातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. वाळपई शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली तर चोरला घाट परिसराच्या घाटमाथ्यावर मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला असून संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाने काळोख केला होता. यामुळे रात्री पाऊस पडण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.