संस्थेचा व्यवहार 4 महिन्यापासून ठप्प
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सत्तरी तालुका शेतकरी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक आता गणेश चतुर्थी नंतर होण्याची शक्मयता आहे .गणेश चतुर्थी नंतर लवकरच ही निवडणूक घेण्यात येणार आहे .खोतोडा पंचायत क्षेत्रातील गवाणे विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक सत्तरी तालुक्मयाच्या निवडणुकी बरोबरच घेण्यात येणार असल्याची एकूण माहिती उपलब्ध झालेली आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुका शेतकरी संस्थेच्या संचालक मंडळासाठी मार्चमध्ये निवडणूक निश्चित करण्यात आली होती. मात्र रोगाचा वाढता प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अंतिमक्षणी रद्द करण्यात आली. गेल्या चार महिन्यापासून या संस्थेचा कारभार पूर्णपणे ठप्प झालेला आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे संस्थेचे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. यामुळे या संस्थेच्या सुरू असलेल्या बँकिंग क्षेत्रावर आता बऱयाच प्रमाणात परिणाम झालेला आहे .कर्जमंजुरी करता येत नाही. त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. यामुळे संस्थेच्या व्यवहारावर बऱयाच प्रमाणात परिणाम झालेला आहे. दरम्यान या संदर्भात सहकार खात्याच्या सूत्राची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्यातरी संचारबंदी लागू असल्यामुळे ही निवडणूक घेता येत नाही. मात्र गणेश चतुर्थी नंतर लवकरच ही निवडणूक घेण्यात येणार आहे.
यासंदर्भाचे नियोजन करण्यात आले असून त्याबाबतची घोषणा लवकरच होणार आहे .सत्तरी तालुका शेतकरी संस्थेची जवळपास 8000 पेक्षा जास्त सभासद आहेत .या संस्थेतर्फे वाळपई होंडा केरी ठाणे अडवई याठिकाणी स्वयंसेवा भांडार सुरू आहेत. त्याचप्रमाणे वाळपई ठाणे अडवई या ठिकाणी बँकिंग काउटर सुरू आहेत .सत्तरी तालुक्मयातील ही जुनी संस्था आहे .यामुळे या संस्थेच्या कार्याशी अनेक सभासद सलग्नीत राहिलेले आहेत. शेतकरी बांधवांच्या विकासासाठी या संस्थेने आतापर्यंत चांगल्या प्रकारचे कार्य केले आहे. मात्र गेल्या चार महिन्यांपासून संस्थेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे ही निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशा प्रकारची मागणी सभासदाकडून वारंवारपणे होत आहे यासंदर्भात अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गणेश चतुर्थी नंतर लवकरच निवडणूक घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भाची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. या संस्थेच्या एकूण अकरा संचालकांचासाठी ही निवडणूक होणार असून पैकी भाग क्रमांक एक मधून 8 संचालक भाग क्रमांक दोन मधून 3 संचालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे . यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काही उमेदवारांनी या संदर्भात प्रचार सुरू केलेला आहे.
त्याचप्रमाणे गवाणे विविध कार्यकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक गणेश चतुर्थी नंतर होणार आहे.यासंदर्भाची तयारी सुरू असल्याचे अधिकारी सूत्रांनी स्पष्ट केले.