वाळपई / प्रतिनिधी
गेल्या 24 तासात सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात वादळी वाऱयासह पावसामुळे प्रचंड प्रमाणात पडझड झाली आहे. वेळूस याठिकाणी मारुती कारवर आंब्याचे झाड पडल्यामुळे 90 हजारांची तर शहरातील सिटी हॉल कॉम्प्लेक्स शेजारी एका घरावर झाड पडून जवळपास 80 हजारांचे नुकसान झाले आहे.
परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पडझड झाली असून रात्री उशिरापर्यंत सर्व झाडे हटविण्यात आली असून रस्ता मोकळा असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
आज उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून जवळपास 30 पेक्षा जास्त ठिकाणी असलेले अडथळे दूर करण्यात आलेले आहेत. तालुक्मयाच्या अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वीज वाहिन्यांची मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास दहा विजेच्या खांबाची नुकसान झाल्याची माहिती वीज अधिकाऱयांनी दिली आहे .
अंजुणे धरणाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत.
वादळी वाऱयाचा जोरदार फटका
दरम्यान यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात अनेकवेळा सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांना प्रचंड प्रमाणात वादळी वाऱयाचा फटका बसला .सोमवारी रात्रभर जोराने वारा वाहत होता. त्याचप्रमाणे मंगळवारी सकाळी व संध्याकाळपर्यंत वाऱयाचे बरेच फटके ग्रामीण भागाला बसल्याचे समजते. यामुळे नागरिकात प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झाली होती.
विविध ठिकाणी प्रचंड पडझड
वादळी वाऱयासह पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सत्तरी तालुक्मयात अनेक ठिकाणी नैसर्गिक पडझड झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सिटी हॉल कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या शेख मोहम्मद अली यांच्या घरावर झाड पडून जवळपास 80 हजारांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या यंत्रणेने धाव घेऊन एक लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले. त्याचप्रमाणे वेळूस गुंडेलवाडा याठिकाणी एका मारुती कारवर (उAध्4ण् 2564)आंब्याचे झाड पडून जवळपास 90 हजारांची नुकसानी झाली आहे. सदर गाडीचा मालक पंकज बोट्टरकर असून जवळपास पन्नास हजाराची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाच्या यंत्रणेला यश आले.
चोरला घाट परिसरात नैसर्गिक पडझड
सोमवारी रात्रभर व मंगळवारी दिवसभर वादळी वाऱयामुळे चोर्ला परिसरात मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक पडझड झाल्याची माहिती हाती आली आहे . अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. मात्र मंगळवारी सकाळपासून अग्निशामक दलाच्या जवानाने धाव घेऊन अनेक ठिकाणी पडलेली झाडे हटविली.यामुळे वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे .सध्यातरी वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गवस यांनी स्पष्ट केले. आज दिवसभर महत्त्वाचे अडथळे दूर करण्यात आले असून उर्वरित अडथळय़ांवर बुधवारी सकाळपासून काम सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान अंजुणे धरणाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असून खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत.