550 जणाचा सहभाग. नगरगाव, ठाणे पंचायत क्षेत्रात चांगला प्रतिसाद. ठाणे येथे 95 वषीय चंपावती नाईक घेतली कोवीड लस
वाळपई / प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून सत्तरी तालुक्मयात आजपासून टिक्का उत्सवाला प्रारंभ करण्यात आलेला आहे .आज सत्तरी तालुक्मयातील ठाणे व नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रांमधून याचा प्रारंभ झाला असून त्याला चांगला प्रतिसाद लाभला. दोन्ही पंचायत क्षेत्रात मिळून जवळपास 550 जणांनी लसेस घेतल्या असून येणारा काळात सत्तरी तालुक्मयातील सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये यासंदर्भाचे कार्यक्रम जाहीर करण्यात आलेले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते ठाणे 70 येथील 95 वषीय चंपावती नाईक यांनी कोवीड लस घेतली.यावेळी मोठय़ा प्रमाणात नागरिक पंच सभासद यांची उपस्थिती होती.
यासंदर्भात माहिती अशी की सध्या भारतामध्ये मोठय़ा प्रमाणात कोवीड रुग्णांमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. यामुळे देशात मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी यालसेस घेऊन हा रोग नियंत्रण आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या संदर्भात टिक्का महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सत्तरी तालुक्मयात याला आज पासून प्रारंभ करण्यात आला प्राप्त माहितीनुसार ठाणे पंचायत क्षेत्रात जवळपास 276 तर नगरगाव पंचायत क्षेत्रात जवळपास 285 च्या आसपास नागरिकांनी या लसेस घेतल्या .यामुळे दोन्ही पंचायत क्षेतामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद नागरिकांनी दिला. येणाऱया काळात इतर पंचायत क्षेत्रातही यासंदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
दरम्यान गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी दोन्ही पंचायत क्षेत्रामध्ये खास उपस्थिती लावून नागरिकांना मार्गदर्शन केले. ठाणे येथील 95 वषीय चंपावती नाईक यांनी कॉवीड लस घेतली.
याप्रसंगी सरपंच प्रजिता गावस उपसरपंच सूर्यकांत गावकर पंच सभासद सरिता गावकर उमेश सावंत गोविंद कोरगावकर निलेश परवार
लता गावकर आरोग्य खात्याचे संचालक श्री डीसा वाळपई आरोग्य खात्याचे अधिकारी डॉ. श्याम कांणकोंणकर विनोद शिंदे व इतरांची खास उपस्थिती होती.
ावेळी आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी सुरू केलेल्या टीका महोत्सवाला नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात सहकार्य करावे असे आवाहन केले आहे .सत्तरी तालुक्मयांमध्ये याला चांगल्या प्रकारचे सहकार्य प्राप्त होणार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे .सध्या देशामध्ये मोठय़ा प्रमाणात कोवीड रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यावर सध्यातरी एकमेव उपाय म्हणजे प्रत्येकाने ही लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सामाजिक अंतराचे पालन करणे व प्रत्येकाने मास्क घालणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी ते म्हणाले .सामाजिक संस्था ,समाज कार्यकर्ते ,पंच सभासद ,नगरसेवकांनी या मोहिमेमध्ये मोठय़ा प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. 95 वषीय चंपावती नाईक यांनी लस घेतल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी नगर्गाव याठिकाणी भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी पंचायतीचे सरपंच प्रशांत मराठे पंच सभासद पराग खाडिलकर, रामा खरवत, समीक्षा सालेलकर लक्ष्मण गावस गोपीकी गावकर यांची उपस्थिती होती.
भिती कसली-निरोगी आयुष्य जगायचे आहे : पावती नाईक
सध्या कोवीड संदर्भात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज निर्माण झालेले आहेत. मात्र आपल्याला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर कोवीड रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लसेस घेणे अत्यंत गरजेचे आहे. भीती कसली बाळगायची ईश्वराने जे जीवन दिलेले आहे ते परिपूर्ण करायचे असेल तर आपण निरोगी राहायला पाहिजे असे विधान 95 वषीय चंपावती नाईक यांनी केले आहे .ठाणे येथील आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवादरम्यान त्यांनी लस घेतल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नसल्याचे उद्गार काढले. गेल्या पंच्याण्णव वर्षांमध्ये अनेक प्रकारच्या संघर्षाला तोंड दिले त्यावेळी कसलीही भीती वाटली नाही आता फक्त लस घेण्यामध्ये भीती कोणती असे स्पष्ट करून त्यांनी समाजामध्ये इतरांनी याचा लाभ घेण्याचा जणू संदेश दिला.
दरम्यान सत्तरी तालुक्मयातील टीक्का कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे तो पुढीलप्रमाणे.
- 12 रोजी वाळपई नगरपालिका(सरकारी रुग्णालयात)
- 14 म्हाऊस पंचायत (सरकारी माद्यमिक विद्यालय दाबे)
- 14 सावर्डे पंचायत(स.मा.वि.सावर्डे)
- 15 पर्ये पंचायत(भुमिका हायरसेंकडरी)
- 15 खोतोडा पंचायत (पंचायत सभागृहात)
- 16 होंडा पंचायत(स.मा.वि.होंडा)
- 16 भिरोंडा पंचायत(स.मा.वि.अडवई)
- 17 पिसुर्ले पंचायत(पंचायत सभागृहात)
- 17 केरी पंचायत(स.मा.वि.केरी)
- 18 गुळेली पंचायत(स.मा.वि.गुळेली)
- 18 मोर्ले पंचायत (काँमुनिटी हाँल).