महिला भगिनीकडुन पारंपरिक वडाचे पूजन
प्रतिनिधी/ वाळपई
सत्तरी तालुक्मयात पारंपरिक वटपौर्णिमाच्या उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सौभाग्यवतीने वडाच्या झाडाचे पूजन करून हा उत्सव साजरा केला. सौभाग्यवती महिला पारंपरिक साडय़ा नेसून वडाचे पूजन करून व्रत पाळतात. अनेक ठिकाणी महिलांनी वडाच्या झाडाला फेऱया घालून सात जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली. वडाच्या झाडांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे अनेक महिला भगिनी घरातच वडाच्या फांद्या पुजून हे व्रत पाळण्यावर भर देत असतात. सत्तरी तालुक्मयाच्या अनेक ठिकाणी हा सोहळा मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात आला.