वाळपई/प्रतिनिधी :
गेल्या चार दिवसांपासून सत्तरी तालुक्मयात कोरोना रोगाचे पॉझिटिव रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्यातरी रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. मलपण सत्तरी येथे आज आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे ही संख्या 14 वर पोहोचली आहे.
सध्यातरी पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या भागांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली असून या रोगाचा संसर्ग ागरिकांना होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती माहिती उपलब्ध झाली आहे.
सत्तरी तालुक्मयात गेल्या चार दिवसांपासून पॉझिटिव रुग्णाच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.याची सुरुवात गुळेली भागातून झाली होती. त्यानंतर हा संसर्ग मोर्ले शिरोली व आता मलपण या भागांमध्ये पोहोचलेला आहे. सध्यातरी प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत रुग्णांची संख्या 13 झाली होती. आज त्यामध्ये आणखीन एक भर पडल्यामुळे ही संख्या 14 वर पोहोचलेली आहे .आरोग्य खात्यात काम करणाऱया मलपण येथील कर्मचारी पॉझिटिव म्हणून सापडला होता .त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आल्यानंतर आज त्याची पत्नी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेली आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे .यात मोर्ले सत्तरी 9 शिरोली सत्तरी मलपण सत्तरी 2 व गुळेली येथे एका रुग्णांचा समावेश आहे .
दरम्यान गुळेली याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची व सभोवताली नागरिकांची चाचणी नकरात्मक आलेली आहे. यामुळे सदर भागांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली होती ती मागे घेऊन व्यवहार पूर्वपदावर येत असल्याचे निदर्शनास येत आहे. या भागातील दुकाने व इतर स्वरूपाची अस्थापना सुरू झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.