ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना संशयितांची टेस्ट अनेकदा निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची 70 टक्के प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अशा लोकांकडून कोरोनाच्या संसर्गाची जास्त भीती असल्याचे मत जागतिक आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या मते, जगभरात 70 टक्के कोरोना निगेटिव्ह रुग्णांना पुन्हा कोरोना झाल्याचे समोर आले आहे. कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याने असे रुग्ण बिनधास्त समाजात वावरत असतात. त्यांना पुन्हा कोरोनाने ग्रासल्याची कल्पनाही नसते. त्यामुळे अशा लोकांकडून कोरोनाचा फैलाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या नव्या धोक्यावर तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणजे कोरोनाचा धोका टळला असे कोणीही गृहीत धरू नये. रिपोर्ट निगेटिव्ह असला तरी कोरोना पुन्हा शरिरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना काही दिवस कुटुंबीयांनी घरात न ठेवता विलगीकरणात ठेवण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे.