ऑनलाइन टीम / मुंबई :
अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला ही केवळ अफवा आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. अशी माहिती शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.
ते म्हणाले, सत्तार उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. माझं आणि सत्तार यांचं बोलणं झालं आहे. त्यांची आता कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, असंही ते म्हणाले.
ते म्हणाले, सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. ते उद्या दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांची मातोश्री येथे भेट घेणार आहेत. माझं आणि सत्तारांचं बोलण झालं आहे. त्यांनी राजीनामा दिला या केवळ अफवा आहेत. त्यांची कोणतीही नाराजी आता नाही. त्यामुळे आता हा विषय संपला आहे, असं खोतकर म्हणाले.