बदल घडविण्यासाठी प्रत्येक डिचोलीकराने कर्तव्य पार पाडावे. डिचोली व्हीजनतर्फे डिचोलीतील मतदारांना आवाहन. पेनल निवडून येणार असल्याचा विश्वास.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली नगरपालिका निवडणुकीत डिचोली व्हीजन पेनलतर्फे अधिकृतपणे रिंगणात उतरलेल्या सर्व 12 उमेदवारांचा प्रचार जोरदारपणे सुरू असून लोकांकडून मिळणारा पाठिंबा हा आमच्या विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित करणारा ठरला आहे. प्रचारादरम्यान या डिचोली नगरपालिका क्षेत्राची सार्वत्रिक पाहणी केली असता डिचोली आजही किती मागास राहिलेली आहे याचा अंदाज आला असून लोकांच्या स्वप्नातील डिचोली साकारण्यासाठी डिचोलीवासीयांनी यावेळी बदल घडविताना आमच्या हातात सत्ता द्यावी. येणाऱया सहा महिन्यांच्या कालावधीत डिचोलीचा चेहरामोहरा बदलण्याची किमया आम्ही करून दाखविणार, असे आश्वासन पेनलचे सर्वेसर्वा डॉ. चंद्रकांत शेटय़? यां?नी पत्रकार परिषदेत केले.
डिचोली नगरपालिका आतापर्यंत विकासाच्या केवळ प्राथमिक स्थरावरच आहे, तेथून पुढे गेलेली नाही. आज प्रचारात फिरताना या पालिका क्षेत्रात किती तरी कामे व्हायची आहेत हे लक्षात येते. त्यासाठीच बदल महत्त्वाचा आहे. आणि तो बदल यावेळीच घडवून आणणे काळाची गरज आहे. या निवडणुकीत आमचे पेनल आल्यास सर्व कामे सुटसुटीत आणि प्रशासनात शिस्तबध्दपणा येणार. लोकांना आपल्या कामांसाठी ताटकळत रहावे लागणार नाही. पालिका मंडळ सक्षम असल्यास पालिका स्वतः मोठा विकास साधू शकते, याचे उदाहरण आम्ही निर्माण करणार. आहे त्याच मनुष्यबळाच्या सहाय्याने सर्व कामे चोखपणे करता येते. पालिकेतील सर्व कामे व व्यवहार हे पारदर्शक असणार व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असेही यावेळी डॉ. चंद्रकांत शेटय़? यां?नी म्हटले.
माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटय़? यांनी यावेळी, डिचोली व्हीजनतर्फे उतरविण्यात आलेले सर्व उमेदवार हे अधिकृत आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार आहेत. आमचा एकही डमी उमेदवार नसून प्रत्येक उमेदवाराचा प्रचार हा जोरदारपणे सुरू आहे. दह वर्षे पंचायत पातळीवरील राजकारणानंतर आम्ही डिचोली शहराच्या राजकारणात आमची वेगळी ध्येयधोरणे आणि संकल्पना घेऊन उतरलेलो आहोत. कोणाचेही पाय ओढणे किंवा खच्चीकरण करणे हा आमचा हेतू नसून आम्ही कोणत्याही पक्षाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संलग्नित नाहीत. आम्ही केवळ जनतेशी आणि जनतेच्या मनांशी संलग्नित आहोत. त्यासाठीच यावेळी या पेनलला डिचोलीवासीयांना संधी द्यावी.
यावेळी डॉ. दिनेश आमोणकर, नारायण बेतकीकर यांनीही या पेनलच्या प्रचाराबध्दल माहिती देत मतदान करण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेला दिलीप धारगळकर, शेखर नाईक, शुभा दिक्षीत व सर्व उमेदवार उपस्थित होते.