अलिकडेच कार्तिक आर्यनचा नवा चित्रपट ‘सत्यनारायण की कथा’ची घोषणा झाली आहे. आता साजिद नाडियावालाच्या बॅनरखाली तयार होणाऱया या चित्रपटाच्या नायिकेशी संबंधित माहिती समोर आली आहे. मॉडर्न डे एपिल म्युझिकल रोमांस ड्रामामध्ये श्रद्धा कपूर ही आर्यनची नायिका म्हणून काम करणार असल्याचे समजते. श्रद्धा कपूरने चित्रपटात काम करण्यास सहमती दर्शविली आहे. पण अद्याप रितसर करार झालेला नाही. कार्तिकने बुधवारी चित्रपटाचा टीजर प्रसारित केला होता. टीजरनुसार हा चित्रपट 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस करणार आहेत. कार्तिक आणि करण जौहर यांचे बिनसले होते. त्यानंतर कार्तिकला अनेक चित्रपटांमधून वगळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कार्तिकसोबत काम करण्यास कुठलीच आघाडीची नायिका काम करण्यास तयार होणार नसल्याची चर्चा होती.
Previous Articleछोटय़ांचं मोठं स्वप्न सा रे ग म प लिटील चॅम्प
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.