अभिनेता जॉन अब्राहम याचा ‘सत्यमेव जयते-2’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. या ऍक्शन ड्रामा चित्रपटात जॉनसोबत अभिनेत्री दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. दिव्या या चित्रपटाद्वारे दीर्घकाळानंतर अभिनयाच्या जगतात पुनरागमन करत आहे.
यापूर्वी तिने 2004 मध्ये प्रदर्शित ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’ चित्रपटात काम केले होते. तर 2014 मध्ये प्रदर्शित ‘यारियां’ आणि ‘सनम रे’चे दिग्दर्शन तिने केले होते. पण ती आता पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्राकडे वळली ओ.
इतकी चांगली संधी मिळाल्याने मी अत्यंत उत्सुक आहे. यापूर्वी मी एक बुलबुल नावाचा लघूपट केला होता. चित्रपटात मिलापने माझ्या व्यक्तिरेखेला चांगल्याप्रकारे दर्शविले आहे. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा अत्यंत दमदार आहे. सद्यकाळात चांगल्या पटकथा समोर येत आहेत. कोरोना संकट ओसरल्याने स्थिती आता पूर्वपदावर येतेय असे दिव्याने म्हटले आहे.
मिलाप जावरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार या चित्रपटात जॉन दुहेरी भूमिकेत दिसून येईल. चित्रपटात जॉन, दिव्या तसेच भूषण कुमार, निखिल अडवाणी, मोनिशा अडवाणी, मनोज वाजपेयी, अनूप सोनी, गौतमी कपूर, दयाशंकर सिंह आणि शाद रंधावा हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित ‘सत्यमेव जयते’चा सीक्वेल आहे.