चित्रपटासाठी 10-12 किलो वजन घटविले
सत्यमेव जयते 2 या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम दुहेरी भूमिकेत आहे. चित्रपटातील एका भूमिकेत तो सामाजिक कार्यकर्ता तर दुसऱया भूमिकेत शत्रूंचा नायनाट करताना दिसून येईल. चित्रपटात जॉन सत्याग्रह आणि हिंसा दोन्हीद्वारे भ्रष्टांना धडा शिकविणार आहे.
ऍक्शन दृश्यांच्या प्रभावीपणासाठी जॉनने स्वतःचे वजन 10 ते 12 किलोंनी कमी केले आहे. चित्रपटाचे चित्रिकरण मागील 15 दिवसांपासून मुंबईत सुरू असून ते 21 जानेवारी रोजी संपणार आहे. लखनौ शेडय़ूलमध्येही अनेक ऍक्शन दृश्ये चित्रित करण्यात आली आहे. ईदच्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समजते.