वार्ताहर / कबनूर
येथील सत्यराज मल्टीपर्पज चॉरिटेबल ट्रस्ट, कबनूर यांच्यामार्फत ज्यांची घरची परिस्थिती हालाकीची आहे, अशा १५० गरीब व्यक्तींना दररोज एक वेळचे जेवण देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. हातावर पोट असलेल्यांचे हाल होऊ नये यासाठी सत्यराज मल्टीपर्पज चॉरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेऊन दररोज १५० गरजू लोकांना २० एप्रिल पासून रोज एक वेळेचे जेवण त्यांच्या घरी पोहोच करत आहे. यामुळे होतकरू गरीब लोकांना दिलासा मिळालेला आहे. कबनूर हायस्कुल रोड वरील अनिकेत केटकाळे यांच्या घरच्या टेरेसवर जेवण करुन ते मागणी नुसार गरीब लोकांना पोच केले जाते.
या कार्यासाठी ट्रस्टला ज्येष्ठ नेते धर्मा अनुरागी सुधाकर मणेरे रोहित मलपुरे यांची मोलाची मदत मिळाली, तर रमजान मुजावर व अजित आडके यांचे सहकार्य मिळाले आहे. तसेच समाजातील दानशूर लोकांनी अन्नधान्य आणि भाजीपाला आणि देणगी स्वरुपात ट्रस्टला मदत करत आहेत. अनिकेत लोखंडे,सत्यम खांडेकर,किरण शिंदे,आशिष पाटील,आनंदा धनगर,पंकज घनगर,विजय भोसले,स्वप्निल भोसले,संतोष पवार,अजय माने,किरण केटकाळे, अनिकेत केटकाळे,अमोल खांडेकर, विनायक भोसले,सागर पांढरपट्टे,अक्षय चव्हाण,दीपक बिचकर,अभिजीत कारंडे हे सर्व पदाधिकारी व सभासद परिश्रम घेत आहेत.