प्रतिनिधी/ सातारा
सन 1995 पासून सदरबजार येथे मुस्लिम समाजाचा इमारतीमध्ये सुरू असलेल्या नगरपरिषद उर्दू शाळा क्र. 12 चा स्वमालकीचा जागेचा प्रश्न अखेर सुटला आहे. जिल्हाधिकाऱयांकडून 14 गुंठे जागा शाळा प्रशासनाकडे हस्तांतर करण्यात आली आहे.
सदरबजार येथे सुरू असलेली उर्दू शाळा ही गेली 25 वर्षे मुस्लिम समाजाचा पडक्या खोल्यांमध्ये सुरू आहे. कोणत्याही सोयीसुविधा नसलेल्या, अगदी छताचीही चाळण झालेल्या खोल्यामध्ये शाळा सुरू असून आपल्या शिक्षणाचा दर्जा मात्र कायम टिकवून ठेवला आहे. मैदानी खेळामध्येही या शाळेला गेली अनेक वर्षे प्रथम क्रमांक मिळत आहे, मात्र खेदाची गोष्ट म्हणजे शाळेला स्वतःची अशी इमारत नाही. सन 2015 मध्ये सदर बाजार येथील तत्कालीन नगरसेविका मुमताज चौधरी यांनी सातारा नगरपरिषदेच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये सि. स. क्र. 409/1अ/1या उपलब्ध असलेल्या जागेचा मागणीसाठी ठराव मांडला. तसा प्रस्ताव ही जिल्हाधिकाऱयांना पाठविण्यात आला. शाळेला जागा मिळावी म्हणून शाळा कमिटीतर्फे अनेक वेळा मंत्रालयाचा पायऱया झिजवून अनेक मंत्र्यांना निवेदने देण्यात आली आहेत. अल्पसंख्याक आयोग, आमदार व खासदारांना भेटून जागा उपलब्ध व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले गेले. सातारा नगरपरिषदेने ही सकारात्मक भूमिका घेऊन खूप सहकार्य केले.
या करिता शाळेचा मुख्याध्यापिका रेशमा शेख यांनी विशेष कष्ट घेतले. तसेच शाळा कमिटीच्या सर्व पदाधिकारी, सदरबजार मुस्लिम समाज, मुमताज चौधरी, लतीफभाई चौधरी यांचे ही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेविका भरती सोळंखी, नगरसेविक सुवर्णा पाटील, नगरसेविका सुजाता राजेमहाडीक यांनी मोलाचे सहकार्य केले.
या नवीन जागेवर नगरपरिषदे मार्फत लवकरच शाळेसाठी इमारत बांधकाम सुरू होणार आहे. या करिता शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा शेख यांनी सर्व मोलाचे सहाकार्य करणाराचे आभार मानले.