नगराध्यक्षपदी सुरेश उदगावे तर उपनगराध्यक्षपदी सुहास वाळके : माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी / सदलगा
गेल्या आठवड्यापासून घुमत असलेल्या सदलगा नगरपरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदांच्या निवड प्रक्रियेला 10:30 वाजता सुरुवात झाली. पहिल्यांदा आ. गणेश हुक्केरी आपल्या सर्व 12 नगरसेवका समवेत दाखल झाले. त्यानंतर खा. आण्णासाहेब जोल्ले आ. महांतेश कवगीमठ आपल्या नगरसेवका समवेत दाखल झाले. तसेच लक्ष्मीकांत हलाप्पन्नवर आपल्या नगरसेवकसह दाखल झाले. निवड अधिकारी तहसीलदार सुभाष संपगावी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडताना कोणतेही घाईगडबड न करता एकीकडे 11 व एकिकडे 12 असे आसनांची व्यवस्था करण्यात आली होती. एक एक खासदार आमदार त्यांनाही आसनाची व्यवस्था करण्यात आली होती.नगराध्यक्ष पद सामान्यांसाठी व उपनगराध्यक्ष ओबीसी (अ) वर्गासाठी आरक्षित होते या अनुषंगाने अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आनंद पाटील आणि अभिजीत पाटील व सुरेश उंदगावे यांनी अर्ज दाखल केला. तसेच उपाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत सुहास वाळके आणि बसवराज हणबर यांनी अर्ज दाखल केला.
गेल्या सव्वादोन वर्षापासुन प्रलंबित असलेल्या सदलगा नगरसभा अध्यक्ष उपाध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यांची उत्सुकता लागली असतानाच वॉर्ड नंबर 12 येथील सुरेश आण्णासाब उदगावे यांची 13 मतांनी नगराध्यक्ष म्हणून तसेच वॉर्ड 21 मधील सुहास सदाशिव वाळके उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तहसीलदार सुभाष संपगावी यांनी घोषित केले. निवडणूक घोषित होताच कार्यकर्त्यांच्या कडून गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार तहसीलदार सुभाष संपगावी यांनी केला. विजय खूण दाखवताना आमदार गणेश हुक्केरी यांनी सदलगा शहराच्या विकासासाठी काँग्रेसबरोबरच जेडीएस व भाजपाच्या काही नगरसेवकांनी आम्हाला साथ दिल्याने या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यात मोठे यश आले आहे. येत्या काळात शहराच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत सर्वांना विश्वासात एकत्र येऊन विश्वासात घेऊन आपण शहराच्या विकासाला चालना देण्याचे असे सांगितले.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुरेश उंदगावे यांनी पावणेदोन वर्षांपासून सगळ्याचा शहराचा विकास खुंटला होता संपूर्ण विकासासाठी आपण एकत्र येऊन या ठिकाणी स्थापन केली असून पुढील काळात विकासाला प्राधान्य देण्याचे असे सांगितले.यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुहास वाळके त्यांनी पक्षाकडून आले असले तरी शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आले असल्याचे सांगितले.
सदलगा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी चुरस दिसून आल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.निवडणूक काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिकोडीचे डीवायएसपी मनोज कुमार नाईक, सीपीआय आर. आर. पाटील , सदलगा पोलीस ठाण्याचे आर. वाय. बिळगी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी या निवडणुकीचे सर्वेसर्वा बसवराज गुंडकल्ले यांच्या चाहत्यांनी सुद्धा त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात विजोत्सव साजरा केला.