दोघा हवालदारांवरही कारवाई
वार्ताहर / सदलगा
सदलगा पोलीस ठाण्यामध्ये दहा दिवसांपूर्वीच उपनिरीक्षक म्हणून चार्ज घेतलेले कुमार हित्तलमनी यांच्यासह दोन हवालदारांवर लाचलुचपत अधिकाऱयांनी कारवाई केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे.
इचलकरंजी येथील रहिवासी असलेले राजू पाचापुरे नामक व्यक्तींकडून पोलीस उपनिरीक्षक कुमार हितलमनी, पोलीस साहाय्यक श्रीशैल मंगी व मायाप्पा गड्डी यांनी राजू यांच्या गुटखा कारखान्यासंदर्भात 40 हजाराची मागणी केली होती. याबाबत राजू पाचापुरे यांनी आठ दिवसांपूर्वीच जिल्हा लाचलुचपत विभागात माहिती देऊन फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीची दखल घेत जिल्हा लाचलुचपत अधीक्षक बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक जी. एम. करूणाकरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक एच. सुनीलकुमार, ए. एस. गुदिगोप, धारवाडचे अली शेख व त्यांच्या सहकाऱयांनी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक कुमार हित्तलमनी यांच्यासह श्रीशैल मंगी व मायाप्पा गड्डी यांना रंगेहाथ पकडले. कारवाईवेळी पोलीस उपअधीक्षक मनोज कुमार नायक, पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्यासह पोलीस खात्याचे वरि÷ अधिकारी उपस्थित होते.
कारवाईनंतर सदर उपनिरीक्षक व साहाय्यकांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.