15 लाखाचा शेतकऱयांना फटका : अग्निशमन दलाचे बंब म्हणजे असून अडचण नसून खोळंबा
वार्ताहर / सदलगा
सदलगा येथे शहराच्या पूर्वेला शहरालगतच असलेला दहा एकरातील ऊस अचानक लागलेल्या आगीमुळे जळून खाक झाला. शहरात असलेल्या अग्निशमन दलात दोन गाडय़ा असून नादुरुस्तीमुळे काही उपयोग होताना दिसत नाही. यामुळे बी. के. कोरे दुधगंगा कृष्णा साखर कारखान्याची एक आणि चिकोडी अग्निशमन दलाची एक अशा दोन गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.
दरम्यान, उपाध्ये यांच्या मालकीचा दहा एकर ऊस जळून खाक झाला. सदलग्यातील अग्निशमन दलाचे बंब म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. येथील बंब नादुरुस्त असल्याने घटनास्थळी आग आटोक्मयात आणण्यासाठी नेता आले नाहीत. चिकोडी, दूधगंगा, कृष्णा कारखान्यावरून बंब येईपर्यंत येथील उपाध्ये यांच्या मालकीचा दहा एकर ऊस जळाल्याने सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. येथील बंब सुरू असते तर एखाद्या एकरावर आग आटोक्मयात आणण्यात आली असती.पवन उपाध्ये तीन एकर, महावीर उपाध्ये चार एकर व दीपक उपाध्ये यांचा तीन एकर असा एकूण दहा एकरातील ऊस जळून खाक झाला. जवळच असलेल्या झोपडीतील दहा जनावरे बांधण्यात आली होती. तिथे स्थानिक नागरिकांनी दक्षता घेऊन जनावरे बाहेर काढण्यात आली.