सदलगा / प्रतिनिधी
सदलगा येथे गुरूवारी एक 26 वषीय गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली, त्यामुळे बाधीतांची संख्या दहावर पोहोचली आहे. गुरूवी आढळलेली बाधीत महिला सदलग्यातील विठ्ठल चौक येथील रहिवासी आहे. बाधीत व्यक्तीला पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले आहे. स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच बाधीत व्यक्तीचे घर, परिसर तसेच नगरपरिषद कार्यालय सॅनिटायझ करण्यात आले. या बाधीत व्यक्तीचे घर सील डाऊन करण्यात आले आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ यशोदा बबली, पोलिस कर्मचारी, नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे पी बी गर्दाळे ,संजू गुडे, महसूल सहाय्यक सलीम सनदी, अकबर सनदी कुमार हिरेमठ, ऋपेश करंगळे मोहम्मद अली, गवंडी कृष्णा बागडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.