अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील सदलापूर येथील एका १८ वर्षीय तरुणीस चुलता व मुलांनी शिवीगाळ करत लथाबुक्क्याने व काठीने डोक्यात मारहाण करून जखमी केले आहे. ही घटना दि १७ रोजी सकाळी ७ वाजता फिर्यादीच्या घरासमोर घडली. चुलता व त्यांच्या मुलांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की सदलापूर ता अक्कलकोट येथील १८ वर्षीय तरुणीस तुम्ही रस्त्यावर पाण्याचा पिंप ( बॅरल ) का ठेवला आहात म्हणून फिर्यादीचे चुलते इरण्णा यशवंत भोसगी यांनी हातातील काठीने डोक्यात मारून जखमी केले. व त्यानंतर इरण्णा यांचा मुलगा शरण, जयेश व मुलगी शिवांजली यांनीही फिर्यादिस शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. यावेळी फिर्यादी आरडाओरडा केली असता भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आईला सुद्धा लथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली असे फिर्यादीने तक्रारीत म्हंटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विपीन सुरवसे हे करीत आहेत.