ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात स्वत: सदाभाऊ यांनी फेसबुकवर माहिती दिली आहे. सध्या सदाभाऊ खोत यांची प्रकृती स्थिर आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी होम क्वारंटाइनचा निर्णय घेतला आहे.
ते आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की, माझा कोव्हिड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी क्वारंटाइन झालो आहे. मी आता उत्तम आहे. आपणही आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गणरायाच्या आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन. धन्यवाद !
दूध दरवाढ आंदोलन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजना करताना सदाभाऊ खोत अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळेच त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या विकासनिधीतून सोमवारी (24 ऑगस्ट) शिराळा तालुक्याच्या आरोग्य विभागास कोव्हिड विलगीकरण कक्षासाठी 20 बेड्स आणि इतर सामग्री देण्यात आली होती. याबाबत त्यांनी फेसबुकवर माहिती दिली होती.