छतावरील पत्रे फोडून केला प्रवेश
प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर, बँक ऑफ महाराष्ट्राजवळील एका भाजी दुकानात चोरीची घटना घडली आहे. 15 दिवसांपूर्वी या परिसरातील तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरात पुन्हा चोरी झाली आहे. चोरटय़ांनी सुमारे 20 हजारांचा माल पळविला आहे.
अन्नपूर्णा भाजी दुकानात चोरीची घटना घडली आहे. भाजीबरोबरच या दुकानात किराणा मालाचीही विक्री होते. छतावरील सिमेंटचे पत्रे तोडून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केला आहे. गल्ल्यातील सुमारे 2 हजारांहून अधिक चिल्लर रक्कम, तेलाचे डबे, पीठ आदी साहित्य पळविले आहे.
नेहमीप्रमाणे दीपक लांडे हे शुक्रवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. याच दुकानात यापूर्वीही दोनवेळा चोऱया झाल्या आहेत. एकाही चोरीचा तपास लागला नाही. तोच तिसऱयांदा हे दुकान फोडण्यात आल्याचे उघडकीस आले. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता फिर्याद दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.