व्यायाम करताना मास्क हटविला तरीही सोशल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक
कोरोनावरील लस उपलब्ध होण्यास अजून मोठा कालावधी आहे. अशा स्थितीत मास्कच बचावाचा सर्वोत्तम उपाय आहे. कोरोनाशी लढताना 6 महिने उलटल्यावरही लोकांच्या मनात मास्कशी संबंधित काही गोंधळ आणि प्रश्न आहेत. व्यायामावेळी मास्क वापरावा की नाही यावरून लोकांमध्ये गोंधळ आहे. परंतु आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार व्यायाम करताना मास्क अत्यंत आवश्यक नाही. कारण अनेकदा घाम येतो आणि मास्क ओला होऊ शकतो. अशा स्थितीत मास्क बॅक्टेरियाची संख्या वाढवितो. परंतु व्यायाम करताना शारीरिक अंतर कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
मास्क घालून शिकवावे
अनेक देशात शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु तेथेही मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. वर्गात मास्क परिधान करून मुलांना कसे शिकवावे असा शिक्षकांना प्रश्न पडला आहे. अनेक शिक्षकांना या त्रासाला तोंड द्यावे लागू शकते, परंतु याकरता शाळेकडून कॉलर माइक व्यवस्था केली जात आहे.
मास्कमुळे डोकेदुखी नाही
अनेक जण मास्कमुळे डोकेदुखी होत असल्याचा युक्तिवाद करतात. परंतु कॉटनचा दोनपदरी किंवा तीनपदरी मास्क घातल्याने कुठलाही त्रास होत नाही. काही जण कर्बवायू बाहेर पडत नाही असा दावाही करतात जो चुकीचा असल्याचे तज्ञ डॉक्टर सांगतात. कॉटनचा मास्क 4-6 तास सलग वापरला जाऊ शकतो. याचबरोबर अनेक लोक मास्क एका बाजूला मळल्यावर दुसऱया दिवशी दुसऱया बाजूने वापरतात. असे करणे चुकीचे असून यातून संक्रमणाचा धोका वाढतो. कारण विषाणू मास्कच्या आवरणावर राहू शकतो. याचमुळे तो धुवूनच वापरला जावा.
रुमाल, घरात तयार केलेला मास्क
नाक आणि तोंड झाकण्यासाठी वापरले जाणारे कापड एकपदरी असू नये. रुमाल एकपदरी असल्यास तो वापरू नये. रुमाल खालून खुला राहिल्यास त्यातून संक्रमणाचा धोका असतो.
मास्क वापरतानाच्या चुका
अनेक लोक मास्क वापरताना त्याचे बंध घट्ट करत नाहीत. अनेकदा वरील बंध बांधतात आणि खालील बंध मोकळे सोडतात. काही लोक वारंवार मास्क नाकाखाली सरकवतात. असे केले जाऊ नये. अशाप्रकारे मास्क वापरल्यास संक्रमणाचा धोका राहतो कुठे जात असल्यास अथवा घराबाहेर राहिल्यास सदैव मास्क वापरला जावा.
मास्क असल्यास धोका 90 टक्क्यांनी कमी होतो
कारण…बोलताना आपल्या तोंडातून बाहेर पडणारे ड्रॉपलेट्स 1.5 ते 2 फुटांपर्यंत जातात. तोंडावर मास्क असल्यास हेच ड्रॉपलेट्स 2.5 इंचाच्या पुढे जात नाहीत. यातून संसर्गाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो.
मास्क कसा वापरावा..
? योग्यप्रकारे परिधान केला तरच मास्क प्रभावी ठरतो.
? मास्क वारंवार वरखाली करणे प्रकर्षाने टाळावे.
? तोंड आणि नाक पूर्णपणे झाकले जाणे गरजेचे.
? कुठलाही मास्क 100 टक्के सुरक्षेची हमी देत नसल्याने वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगसोबत अधिक सुरक्षित राहता येईल.