न्यूयॉर्क
कोरोना व्हायरसच्या जागतिक प्रसारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्राची घडी पूर्णपणे विस्कटली असल्याने आता तिला सावरण्यासाठी बराच कालावधी लागेल. अशा स्थितीत सध्या न खेळणेच योग्य ठरणार आहे, असे प्रतिपादन अमेरिकन टेनिस संघटनेच्या प्रवक्त्याने केले. कोव्हिड-19 चा जलद प्रसार अमेरिकेत होत असून आतापर्यंत सुमारे दोन लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेतील सर्व क्रीडास्पर्धा तहकूब करण्यात आल्या आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या भवितव्याबाबत काहीही अंदाज वर्तविता येत नाही. कोरोनाची जंतू झपाटय़ाने प्रसरत असल्याने टेनिस चेंडूच्या माध्यमातूनही बाधा होवू शकते. त्यामुळे अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा लांबणीवर टाकली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे तर विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा रद्द झाली आहे.