गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वेंकू गावडे यांचे प्रतिपादन : करमळीत ओम साई कला संघ आयोजित फुगडी महोत्सव उत्साहात
प्रतिनिधी /पणजी
कोणताही कार्यक्रम असो त्यातून सामाजिक कार्य होणे गरजेचे आहे. आपली लोककला टिकविण्याचे काम कलाकारांनी केले पाहिजे. आजच्या आधुनिक युगात पारंपारिक कलांचे उपक्रम राबविणे म्हणजे तारेवरची कसरत केल्याप्रमाणे वाटते. ओम साई कला संघ असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून गावातील तसेच राज्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करीत असून तो अभिनंदनास पात्र आहे, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वेंकू गावडे यांनी सांगितले.
गावसभाट करमळी येथील ओम साई कला संघ आणि कला व संस्कृती संचालनालय यांच्या विद्यमाने शिर्नेवाडा करमळी येथील साईमंदिर सभागृहात आयोजित केलेला फ्gढगडी महोत्सव उत्साहात पार पडला.
महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वेंकू गावडे होते, यावेळी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले.
निमंत्रित म्हणून नाटयकर्मी तथा समाजसेवक भालचंद्र उसगावकर, सन्माननीय अतिथी म्हणून सरपंच उत्तम मुरगावकर, पंचसदस्य मोहनदास खोलकर, देवस्थानचे अध्यक्ष मेघश्याम मडकईकर, नारायण नाईक व संस्थेच्या अध्यक्षा सनिपा अडकोणकर उपस्थित होत्या.
त्यानंतर कामाक्षी कला व सांस्कृतिक मंडळ रायबंदर, गोपाळकृष्ण महिला मंडळ चोडण, श्री महालक्ष्मी फ्gढगडी मंडळ सुर्ला, श्री सिध्दी विनायक मंडळ दिवाडी, सातेरी महिला मंडळ भोमा व ओम साई कला मंडळ करमळी या पथकांनी फ्gढगडी सादर केली. सनिपा अडकोणकर हिने स्वागत केले. यज्ञा कवळेकर हिने सूत्रसंचालन करून आभार मानले.