वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील कोरोनाच्या दुसऱया लाटेने परिस्थिती चिंताजनक बनविली असून देशातील कोरोनाग्रस्तांसाठी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया सनरायजर्स हैद्राबाद आणि सन टीव्हीच्या मालकांनी 30 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
देशामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. गेल्या काही दिवसात संपूर्ण देशात प्रत्येक दिवशी कोरोना बाधितांचा आकडा चार लाखापेक्षा अधिक होत असून प्रत्येक दिवशी किमान 4 हजार लोकांचे बळी पडत आहेत. केंद्र शासन आणि आंध्रप्रदेश शासनातर्फे कोरोनाग्रस्तांसाठी अंमलात आणल्या जाणाऱया विविध योजनासाठी सनरायजर्स हैद्राबादकडून 30 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघातील खेळाडू साहा त्याचप्रमाणे इतर संघांतील तीन खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी तहकूब करण्यात आली आहे.