अंकित चंदिरामणि यांचे ‘सनशाईन स्टुडिओज’ वितरण क्षेत्रात कायमच आघाडीवर राहिले. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपटांचे वितरक म्हणून आणि तब्ब्ल 70 हून अधिक मराठी चित्रपटांचे वितरक आणि प्रस्तुतकर्ते म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत आपले नाव कमावले. आता नव्याने ‘सनशाईन स्टुडिओ’ केरळमध्ये हरवलेल्या मुलावर आधारित एका नव्याकोऱया हिंदी चित्रपटाच्या निर्मितीतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यात सनशाईन स्टुडिओ हे सुनिल जैन प्रॉडक्शन (एसजेपी) आणि आशिष अर्जुन गायकर यांचे (एजीएफएस) यांच्यासह बाल तस्करी आणि हरवलेल्या मुलांच्या रहस्यमय जगात डोकावणाऱया या आशयघन आणि रहस्यमय चित्रपटाची निर्मिती करुन प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या थ्रिलरला ‘बॅकवॉटर्स’ हे नाव एफटीआयआयचे पदवीधर आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव ठाकूर यांनी दिले आहे.
सनशाईन स्टुडिओ ही वितरक कंपनी पहिल्यांदाच निर्मितीक्षेत्राकडे पाऊले उचलत आहे. बऱयाच नावाजलेल्या हिंदी चित्रपटांचे वितरक म्हणून आणि मराठी चित्रपटात वितरक आणि प्रस्तुतकर्ते म्हणून उत्तम कामगिरी केली. तब्बल 300 हुन अधिक चित्रपटांचा अनुभव गाठीशी आहे. सुनील जैन प्रॉडक्शनने अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री इसाबेल कैफ यांच्या ‘क्वाथा’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. याशिवाय एका वेबसिरीज आणि अनेक चित्रपटांच्या निर्मितीतून प्रेक्षकांच्या भेटीस येतील. 2005 सालात केरळसारख्या देवांची भूमी मानल्या जाणाऱया शहरातून हरवलेल्या राहुल राजू या सातवर्षीय लहान मुलाचा शोध अजूनही लागलेला नाही. राहुलप्रमाणे आजही कित्येक मुले बेपत्ता झाली असतील आणि त्यांचा शोध कशाप्रकारे घेतला जाईल यावर आधारित चित्रपट करणे म्हणजे एक टास्कच आहे. कारण ही सिरीज म्हणजे अपहरणसारख्या गंभीर विषयात डोकावणेच होय. सिरीजमध्ये दिल्ली थिएटर अभिनेता सरताझ खरे हा सीबीआय अधिकाऱयाच्या भूमिकेत महत्वाची भूमिका साकरणार आहे. तर युकेची मॉडेल नीता परानी ही एकाचवेळी अनेक तथ्यांच्या शोधात असणाऱया पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट वर्षाच्या अखेरीस केरळमधील अलाप्पूझा येथे चित्रित करण्यात येणार आहे.