किंमत जाणून थक्क व्हाल
सनी लियोनी आणि तिचा पती डॅनियल वीबरने नवे घर खरेदी केले ओ. आम्ही आमच्या मुलाना एक योग्य घर देऊ इच्छित होतो असे तिने म्हटले आहे. बॉलिवूडमध्ये एक दशक पूर्ण केलेली सनी लियोनी दीर्घकाळापासून भाडय़ाच्या घरात राहत होती. सनीने मुंबईत तीन बेडरुमचे लॅव्हिश पेंटहाउस खरेदी केले असून त्याची किंमत सुमारे 16 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबइंत घर घेण्याचा निर्णय अत्यंत भावुक होता. भारतातच आम्ही बहुतांश वेळ वास्तव्य करतो. आमची तीन मुले असून एका अपार्टमेंटमधून दुसऱया अपार्टमेंटमध्ये स्थलांतर करावे लागत असल्याने मुलांना योग्य ठिकाण देत नसल्याचे आम्हाला वाटू लागले होते. मुलांना प्रेम जडेल आणि भावना गुंतू शकतील असे ठिकाण देण्याची आमची इच्छा होती असे सनीने सांगितले आहे.
गोष्टी कायमस्वरुपी करण्याची वेळ आता आली आहे. माझी मुले देखील सध्या या नव्या घरात भरपूर आनंद घेत आहेत. त्यांना बाइक्स राइड करण्यासाठी उद्यानात खेळण्यासाठी मोठी जागा मिळत आहे. स्वीमिंग पूलसह अनेक सुविधा असल्याचे तिने म्हटले आहे.