जिल्हा मुद्रांक अधिकारी साहेबराव दुतोंडे
प्रतिनिधी / सांगली
सन १९८४ पासूनचे सर्व खरेदी दस्त आता ऑनलाईन होणार आहेत. आयजीआरने यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सर्व दस्तांच्या स्कॅनिंगचे काम सुरू झाले आहे. याचा नागरिकांना चांगला फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा मुद्रांक अधिकारी साहेबराव दुतोंडे यांनी दिली. गुंठेवारी संघर्ष चळवळ समितीने यासाठी पाठपुरावा केला होता.
सन २००२ पासून झालेले खरेदी दस्त नागरिकांना ऑनलाईन मिळत होते. खरेदी दस्त झाल्यानंतर त्याचे स्कॅनिंग केले जाते. खरेदी दस्त जतन करून ठेवले जात होते. मात्र तत्पुर्वीचे खरेदीदास्त शोधावे लागत होते. त्यामुळे १९८४ पासूनचे दस्त ऑनलाईन करावेत अशी मागणी गुंठेवारी संघर्ष चळवळ समितीने केली होती. जिल्हा मुद्रांक अधिकारी दुतोंडे यांनी यासाठी पाठपुरावा केला. आयजीआरनेही याला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार १८८४ पासूनच्या खरेदीदस्ताच्या स्कॅनिंगला सुरवात झाली आहे.