ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच समाजवादी पक्षाने भाजपच्या दोन बडय़ा मंत्र्यांसह काही आमदारांना फोडून भाजपला झटका दिला. त्यानंतर भाजपने थेट यादवांच्या घरातच फुट पाडली. मुलायमसिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत साडेदहा वाजता पक्ष कार्यालयात त्यांचा सदस्यत्व समारंभ होणार आहे.
अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांचा मोठा मुलगा प्रतिक यादव यांच्या पत्नी आहेत. अपर्णा आणि प्रतीक यांचे लग्न 2010 मध्ये मुलायम सिहांचे गाव सैफईमध्ये झाले होते. त्यांना आधीपासूनच राजकारणाची आवड होती. अपर्णा समाजवादी पक्षात असूनही त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर स्तुती करताना दिसत होत्या. अपर्णा यांनी लखनऊच्या कँट मतदारसंघातून 2017 ला विधानसभा निवडणूक लढवली होती. पण निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी पराभव केला होता. अपर्णा यादव यांनी ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशन अँड पॉलिटिक्समध्ये मास्टर केली आहे.