शिराळा / प्रतिनिधी
शिराळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी जिल्हा अधिकारी डॉ अभिजित चौधरी ,पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम प्रमुख उपस्थित होते.
सपोनि पाटील यांनी मांगले येथील घरफोडीच्या गंभीर गुन्हाचा अवघ्या चोवीस तासात छडा लावला होता. यामध्ये दोन आरोपी आणि चोरीला गेलेले बत्तीस तोळे सोने, 400 ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करून, गुन्हा उघडकीस आणला होता. याबद्दल त्यांना प्रशंशापत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.