ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अर्थ मंत्रालयाने गुरुवारी वस्तू आणि सेवा कर महसुलाची आकडेवारी जारी केली. त्यानुसार सप्टेंबरमध्ये जीएसटी महसूलामध्ये सुधारणा झालेली दिसली.
सप्टेंबर 2020 मध्ये एकूण 95,480 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलित करण्यात आला, यामध्ये सीजीएसटी 17,741 कोटी रुपये, एसजीएसटी 23,131 कोटी रुपये, आयजीएसटी 47,484 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 22,442 कोटी रुपये सह) आणि सेस 7,124 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 788 कोटी रुपये सह) समावेश आहे.
सरकारने आयजीएसटी मधून सीजीएसटीला 21,260 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 16,997 कोटी रुपये नियमित सेटलमेंट म्हणून, दिले आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये नियमित सेटलमेंट नंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 39,001 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 40,128 कोटी रुपये आहे.
मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा सप्टेंबर 2020 चा महसूल 4% जास्त आहे. सप्टेंबर 2020 मध्ये वस्तूंच्या आयातीमधून मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळालेल्या महसुलाच्या 102% होता आणि देशांतर्गत व्यवहाराद्वारे (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल 105 % होता.