प्रतिनिधी/ मडगाव
सप्टेंबर महिन्याच्या गेल्या 12 दिवसांत गोव्यात कोरोनाचे 91 बळी गेले आहेत. बारा तालुक्यापैकी नऊ तालुक्मयांमध्ये मृत्यूची नोंदणी झालेली आहे. त्यात सासष्टी तालुक्यात एकूण 21 जणांचे बळी गेले आहेत. सासष्टीत आतापर्यंत बळी गेलेल्याची संख्या 72 वर पोचली आहे. तिसवाडी तालुका दुसऱया क्रमांकावर पोहचला असून या तालुक्यात सप्टेंबर महिन्यात गेल्या 12 दिवसात एकूण 15 बळी गेले आहेत. तिसवाडीतील एकूण बळींची संख्या 43 वर पोचले आहेत.
बार्देश व फोंडा तालुक्यात गेल्या 12 दिवसांत प्रत्येकी 13 बळी गेले आहेत. बार्देशमधील बळीचा आकडा 30 वर तर फोंडय़ातील बळींचा आकडा 29 पोहचला आहे. गोव्यात कोरोनाची महामारी सुरू झाल्यानतंर सर्वाधिक फटका हा मुरगाव तालुक्याला बसला होता. मुरगाव तालुक्यात आतापर्यंत 69 बळींची नोंद झालेली आहे. त्यात सप्टेंबर महिन्यात 12 बळी गेले आहेत. डिचोली तालुक्यात सप्टेंबरमध्ये 8 बळी तर एकूण बळीची संख्या 15 वर पोचली आहे. पेडणेत सप्टेंबरमध्ये 5 बळी तर एकूण बळी 8 झाले आहेत. केपेत आतापर्यंत 6 बळी गेले असून सप्टेंबर महिन्यात 2 बळींची नोंद झालेली आहे. सांगे तालुक्यात सप्टेंबर महिन्यात 1 बळी तर एकूण बळीची संख्या 5 पोचली आहे.
काणकोण, सत्तरी व धारबांदोडा या तीन तालुक्यात गेल्या 12 दिवसांत एका ही बळीची नोंद झालेली नाही. पण, यापूर्वी काणकोण व सत्तरी तालुक्यात प्रत्येक दोन बळीची नोंद झालेली आहे, तर धारबांदोडा तालुक्यात एकाच बळीची नोंदणी झालेली आहे.
कोरोना मृत्यूने गोव्यातील नवीन भागात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यात हरमल-पेडणे, डिचोलीत नार्वे, बार्देशमधील आसगांव, पर्रा आणि पेन्हा दा फ्रान्स तर तिसवाडीमधील कुडका-बांबोळी, चोडण, शिरदोन आणि मेरशी, फोंडय़ातील कुर्टी, खांडोळा आणि नागेशी. सासष्टीत दवर्ली, सांव जुझे दी आरियल, नुवे आणि वेळळी व मुरगाव तालुक्यात वेर्णा तर सांगेत सावर्डे भागाचा समावेश आहे.
गोव्यात आतापर्यंत कोरोनाची 24,185 प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यातील 18,576 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच कोरोनाचे 77 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.