प्रतिनिधी /वास्को
सप्तसूर या संगीत-नृत्य- नाटय़-कला व सांस्कृतिक संस्थेचा दहावा वर्धापनदिन वाडे वास्को येथील सुरेखा सांचेस विहार सोसायटीत उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त महेंद्र गांवकर, संगीत शिक्षक रतनजी बेतकीकर, भजनी कलाकार अशोक मांद्रेकर, जायंट ग्रुप ऑफ वास्कोचे अध्यक्ष संजय बाणावलीकर, सत्कारमूर्ती विनोद आलेंकर, ॐ साई दामोदर सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाईक व सप्तसूर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय उर्फ राजेंद्र केरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पुजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. विजय (राजेंद्र केरकर) यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ‘निषाद पर्यंतची वाटचाल-9’ या स्मरणीकेचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री रूमडेश्वर दत्तात्रय सांस्कृतिक महिला भजनी मंडळाच्या शिष्य वर्गातर्फे संगीत शिक्षक विजय (राजेंद्र) केरकर यांचे गुरूपूजन करण्यात आले. तद्नंतर संगीत व नाटय़कलाकार विनोद आर्लेकर व महेंद्र गांवकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सप्तसूर संस्थेतर्फे मुरगाव तालुका मर्यादित आयोजित केलेल्या शब्द कोडे, संगीतातील रागांची नावे, संगीतातील वाद्यवृंदाची नावे, संतांची नावे, गीतातील राग ओळखा तसेच सामान्य प्रश्नावली स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेतील पहिले बक्षीस अनुराधा कामत हिने पटकावले. स्पर्धेतील दुसरे बक्षीस चिन्मय पाटकर व अंजली देवंद्र होन्नावरकर, जैमिनी पैंगिणकर व ज्योती कवठणकर (विभागून), तिसरे बक्षीस रसिका गुरूदत्त खाजनेकर, हिरा संदीप पर्येकर, सुजाता शंकर देसाई, रजनी तोरस्कर, रिया मयेकर (विभागून) यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिसे रचना रामा निरवडेकर, अरूण सावंत, महादेव नाईक, अश्विनी रेडकर व शंकर चव्हाण यांना देण्यात आली.
महिला भजन स्पर्धेत श्री नागेश महारूद्र भजनी मंडळ प्रथम
दरम्यान, श्री ओम साई दामोदर सांस्कृतिक संस्था व सप्तसूर संगीत संस्था वाडे वास्को यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला भजन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे पहिले बक्षीस कुडका येथील श्री नागेश महारूद्र भजनी मंडळाने पटकावले.
या स्पर्धेसाठी श्री ईस्वटी ब्राह्मण लक्ष्मी-नारायण देवालय (हेडलॅण्ड-सडा), श्री रूमडेश्वर देवालय (रूमडावाडा), श्री हनुमान संस्थान (नॉनमॉन खारवीवाडा), श्री खाप्रेश्वर देवस्थान (बेलाबाय), श्री दत्तात्रय संस्थान (ओरूले), श्री हनुमान संस्थान (नवेवाडे) व श्री गोपाळकृष्ण संस्थान (धाकतळे मांगोरहिल) या देवस्थान समितीचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे परीक्षण लोककलाकार महेंद्र गांवकर यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे ः प्रथम – श्री नागेश महारूद्र भजनी मंडळ (कुडका), द्वितीय – श्री तिरूपती बालाजी सांस्कृतिक संस्था (हेडलॅण्ड-सडा) व शिवसमर्थ भजनी मंडळ (नवेवाडे-वास्को), तृतीय – श्री रूद्रेश्वर दत्तात्रय महिला भजनी मंडळ (रूमडावाडा), श्री इस्वटी ब्राह्मण सांस्कृतिक महिला भजनी मंडळ (हेडलॅण्ड-सडा), उत्तेजनार्थ बक्षिसे – श्री गजानन बोगदेश्वर महिला भजनी मंडळ (बोगदा), श्री ब्राह्मणेश्वर महिला भजनी मंडळ (बेलाबाय वास्को), श्री कृष्ण दामोदर महिला भजनी मंडळ (धाकतळे मांगोरहिल), श्री हनुमान संगीत महिला भजनी मंडळ (नॉनमॉन), श्री खाप्रेश्वर महिला भजनी मंडळ (बेलाबाय).
वैयक्तिक बक्षिसे – उत्कृष्ठ गायीका ः रूपा च्यारी (श्री शिवसमर्थ भजनी मंडळ, नवेवाडे), उत्कृष्ठ गौळण गायीका – कु. सेजल नाईक (तिरूपती बालाजी संगीत सांस्कृतिक संस्था, हेडलॅण्ड-सडा), उत्कृष्ठ पखवाज साथी – कु. स्नेहा नार्वेकर (श्री ब्राह्मणेश्वर भजनी मंडळ) व कु. प्रसाद परब (श्री हनुमान भजनी मंडळ नवेवाडे), उत्कृष्ठ संवादिनी वादक – कु. शलाका चव्हाण (हनुमान महिला भजनी मंडळ, नॉनमॉन).
सप्तसूर संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन लोककलाकार महेंद्र गांवकर, अशोक मांद्रेकर, उदय मळगावकर, दिनानाथ निरवडेकर यांच्याहस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात रेवा निरवडेकर हिने गणेश स्तवन सादर केले. तद्नंतर श्री रूमडेश्वर दत्तात्रय सांस्कृतिक महिला भजनी मंडळाच्या कलाकारांनी भक्तीगीते, अभंग व गौळणी सादर केल्या. त्यांना संवादिनीवर विजय केरकर, विघ्नेश सावंत व वासुदेव फडते तर तबल्यावर विनीत ससावंत, विष्णू काजळे, प्रविण लिमये, संदेश नेरूरकर यांनी साथसंगत केली. यावेळी साचि गांवकर व सर्वेद गांवकर यांनी नृत्य सादर केले. मेघराज केरकर, रमेशलाल राजपूत, देवानंद केरकर, चेतन परदेशी, राजेंद्र केरकर यांनी हिंदी व मराठी करोओके गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशा कळंगुटकर हिने केले. संजय राम यांनी आभार मानले.