सेन्सेक्स 2476 तर निफ्टी 708 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
शेअर बाजाराने गेले तीन दिवस विश्रांती घेतली होती. आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी महावीर जयंतीची सुट्टी होती. बाजाराची पहिल्या दिवशीची मंगळवारची सुरूवात तेजीने झाली. यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांच्यात तेजीची उसळी पहावयास मिळाली. सोबत बँकिंग क्षेत्रात 22 टक्क्मयांहून अधिकची तेजी राहिली. सकाळी बाजार सुरु होताना सेन्सेक्स 1224 अंकांनी आणि निफ्टी 362 अंकांनी वधारला. दिवसभरातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 2500 अंकांचा टप्पा गाठला होता. मात्र बाजार बंद होताना, सेन्सेक्स 2476.26 अंकांनी वधारुन निर्देशांक 30,067.21 वर बंद झाला. दुसऱया बाजूला निफ्टीने 708.40 अंकांनी वाढ नोंदवून निर्देशांक 8,792.20 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले.
सोमवारी अमेरिकेच्या बाजारांसोबत जगातील अन्य बाजार तेजी नोंदवत बंद झाले आहेत. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक झाल्याने तेजी नोंदवण्यात आली. बीएसईमधील 20 टक्के कंपन्यांचे समभाग घसरलेत. तर 26 कंपन्यांचे समभाग मात्र वर्षभराच्या उच्चांकी कामगिरीवर बंद झाले आहेत. 189 कंपन्यांचे समभाग मात्र सर्वाधिक घसरण झाल्याचे नोंदवले आहे.
बँकिंग क्षेत्रात उत्साहाचे वारे
आठवडय़ातील पहिल्या दिवशीच्या कामगिरीवर जागतिक शेअर बाजारांमधील तेजीच्या मोहोलाचा प्रभाव पडल्याने भारतीय बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले. बँकिंग क्षेत्रात 22 टक्क्मयांनी तेजीत राहिल्याचे दिसून आले. इंडसइंड बँक 18.10, ऍक्सिस बँक14.99, आयसीआयसीआय बँक 10.00, एचडीएफसी बँक 8.05, कोटक बँक 4.56, फेडरल बँक 3.88, स्टेट बँक 2.96 आणि आरबीएल बँकेचे समभाग 2.93 टक्क्मयांनी तेजीत राहिले होते.
जगावरील कोरोनाचे संकट दिवसागणिक गडद होत असल्याने विविध रेटिंग कंपन्या आगामी काळात कोणते चित्र व्यापारी वर्गाचे राहणार आणि त्यांचे बरेवाईट अनुमान मांडले जात आहे. या सर्वाचा शेअर बाजारावर प्रभाव राहणार असल्याचे संकेत तज्ञांनी मांडले आहेत.