बँकिंग क्षेत्राचे समभाग घसरणीत – सेन्सेक्स 20 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजार चालू आठवडय़ातील अंतिम सत्रात शुक्रवारी घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये मागील दोन दिवस बुधवार व गुरुवारी प्राप्त केलेली तेजी कायम राखण्यात बाजाराला यश आले नसल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर बाजार 20 अंकांनी प्रभावीत होत काहीशी घसरण होत बंद झाल्याचे दिसून आले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स दिवसअखेर 20.46 अंकांनी घसरुन निर्देशांक 58,786.67 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 5 अंकांनी घसरुन 17,511.30 वर बंद झाला आहे. घसरण राहण्यास प्रामुख्याने बँपिंग क्षेत्रातील समभागांचा परिणाम कारणीभूत ठरला आहे.
सेन्सेक्स 111 अंकांनी शुक्रवारी घसरणीसह खुला झाला होता. परंतु दिवसभरात यामध्ये 58,859 अंकांचा उच्चांक तर 58,414 अंकांचा नीचांकी स्तर प्राप्त केला असल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख 30 समभागांमध्ये 19 समभाग घसरणीसह बंद झाले असून यातील 11 समभाग वधारत बंद झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने एशियन पेन्ट्स, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्ह तसेच बजाज फायनान्स यांचा समावेश राहिला आहे. दुसरीकडे टायटन, ऍक्सिस बँक, कोटक बँक व एअरटेल यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17,476 वर खुला झाला होता यामध्ये दिवसभरात 17,534 अंकांचा टप्पा प्राप्त केला होता. यात मिडकॅप आणि बँक निर्देशांक तेजीत होता. निफ्टीत फायनान्शिअल निर्देशांक मात्र घसरणीत राहिला होता.
इंडसइंड बँकेमध्ये एलआयसीची हिस्सेदारी
इंडसइंड बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने एलआयसीला यामधील हिस्सेदारी वाढविण्यासाठी मंजुरी दिली आहे. सध्या एलआयसीची हिस्सेदारी 4.95 टक्के आहे.
समभाग घसरलेल्या कंपन्या