खासदाराच्या नातवाविरोधात लढणार
समाजवादी पक्षाचे कुंदरकी मतदारसंघाचे आमदार हाजी रिझवान यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. यामुळे नाराज झालेले रिझवान यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनी कुठल्या पक्षातून निवडणूक लढविणार हे सांगितले नव्हते. यानंतर त्यांना समाजवादी पक्षाने 6 वर्षांसाठी बडतर्फ केले होते. रिझवान यांनी मंगळवारी बसपचे सदस्यत्व प्राप्त पेल आहे. मायावतींनी कुंदरकी मतदारसंघातील उमेदवार म्हणून त्यांची घोषणा देखील केली आहे. यापूर्वी बसपने येथील स्वतःचा उमेदवार जाहीर केला होता. परंतु आता तो बदलून हाजी रिझवान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशच्या राजकारणात झालेल्या या मोठय़ा बदलामुळे मुरादाबाद येथील कुंदरकी मतदारसंघात त्रिकोणी लढत होणार आहे. भाजपने येथे कमल प्रजापति यांना उतरविले आहे. तर सपने संभल खासदार शफीउर्ररहमान बर्क यांचे नातू जियाउर्ररहमान यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही.