बरेली / वृत्तसंस्था
तालिबानने अफगाणिस्तानात मिळविलेल्या विजयाची तुलना भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाशी केल्याने समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर रहमान बर्क यांच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे. बर्क हे संबल या मतदारसंघाचे लोकसभा सदस्य आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे स्थानिक नेते राजेश सिंघल यांनी तक्र ार सादर केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तालिबान अफगाणिस्तानात गोरगरिबांचा लढा लढत आहे. ही संघटना भारताने जसा ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठी लढा दिला तसा अफगाणिस्तानच्या लोकांसाठी देत आहे. या संघटनेच्या अनेक सदस्यांनी प्राणार्पण पेले आहे. एका निःशस्त्र आणि गरीब सैनिकांच्या संघटनेने बलाढय़ आणि श्रीमंत सेनेचा पराभव केला, अशी भलावण बर्क यांनी केली होती. त्यांनी तालिबानच्या समर्थनार्थ आणखी काही विधाने पत्रकार परिषदेत केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांनी घुमजाव केले. अशी विधाने केलीच नव्हती, असा दावा त्यांनी केला. तथापि, त्यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ उपलब्ध करण्यात आला आहे.