शहर स्वच्छ करणाऱयांकडे लक्ष द्या, अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील इतर शहरांमधील सफाई कामगारांना विविध सुविधा देण्यात आल्या. मात्र बेळगाव जिह्यातील आणि शहरातील स्वच्छता कर्मचाऱयांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून कोरोना काळात काम करूनही आम्हाला कोणत्याच सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करत आहेत. सरकारने आम्हाला जी आश्वासने दिली होती, त्याचे पालन करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे सफाई कर्मचारी संघटनेने केली आहे.
पहाटे उठून शहरातील कचऱयाची उचल सफाई कर्मचारी करत आहेत. मात्र त्यांना राहण्यासाठी घरे मंजूर केली नाहीत. 253 घरे मंजूर झाली आहेत. मात्र अजून घरे दिली नाहीत. शहापूर येथील पी.के. क्वॉर्टर्स कधी कोसळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. तेंव्हा तातडीने आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक वाघेला, मुनीस्वामी भंडारी, फिलोमीन कुंचन, विजय निरगट्टी व कर्मचारी उपस्थित होते.