डिचोली/प्रतिनिधी
गोवा विधानसभेचे सभापती तथा डिचोली मतदार संघाचे आमदार याना गोमेकोतून शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
पाटणेकर यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण काही दिवस घरूनच कामकाज हाताळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटणेकर यांनी पूर्वनियोजित अपॉइंटमेन्ट घेऊन गोमेकॉत तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना काही दिवस विविध तापसणीसाठी दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांची कोविड चाचणीही निगेटिव्ह आलेली आहे. सद्या विश्रांतीचा सल्ला दिल्याने आपण घरीच राहणार आहे असे पाटणेकर यांनी सांगितले. आपल्या प्रकृतीची विचारपूस करणाऱया सर्वाना त्यांनी धन्यवाद दिले आहेत.