दाक्षिणात्य अभिनेत्री सॅमंथा अल्किनेनी खूपच सुंदर आणि तंदुरुस्त आहे. लॉकडाउन असो किंवा नसो, जीम सुरू असो किंवा नसो सॅमंथाच्या फिटनेस रूटिनमध्ये कोणताही बदल झाला नाही. सॅमंथाने घरीच व्यायाम केला. त्यातही तिने योगाला प्राधान्य दिलं. सॅमंथाही चाहत्यांसाठी व्हिडिओ शेअर करत असते. तिने मध्यंतरी योगा करतानाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
सॅमंथा कोणतंही धाडस करायला मागेपुढे बघत नाही. म्हणूनच ती एरियल योग करताना दिसते. नवे व्यायामप्रकार, योगासनं ती अगदी सहजपणे करते. एरियल योगामुळे वजन वेगाने कमी होऊ लागतं. हे एक कठीण आसन असलं तरी याचे अनेक लाभ आहेत.
दिवसभर काम करून आलेला थकवा आणि ताण दूर करण्यासाठी मेडिटेशन करायला हवं. याला ईशा क्रिया असंही म्हटलं जातं. सॅमंथाने ईशा क्रिया करतानाचा एक फोटो शेअर केला असून या आसनामुळे ताण कमी होत असल्याचं तिने म्हटलं आहे.
सॅमंथाने बकासनातला फोटोही पोस्ट केला आहे. हे आसन करणं बरंच कठीण असतं. मात्र सॅमंथाने सरावाने सगळं काही शक्य करून दाखवलं आहं. सॅमंथाला बागकामाचीही आवड आहे. निवांतपणा अनुभवण्यासाठी ती बागकामही करते.