प्रतिनिधी/ वाई
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व शहर विकास कामांसादर्भात बोलावण्यात आलेली वाई पालिकेची सभा सत्ताधारी व विरोधकांतील योग्य समन्वयाअभावी पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारात तहकूब केली.
वाई पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती .या सभेला उपनगराध्यक्ष अनिल सावंत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ सर्व सदस्य उपस्थित होते.
सभेला सुरुवात होताच मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात येत होते. यावेळी दिनांक 26 मार्च 2021 रोजीची सभा झालेलीच नाही तर त्याचे इतिवृत्त नोंद कशी घेणार असे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी विचारले. यावेळी नगराध्यक्षांनी मागील सभेमध्ये सर्वानुमते चर्चा झाली आहे आणि जे विषय मंजूर करायचे होते ते मंजूर केलेले आहेत जे नामंजूर करायचे होते ते सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत नामंजूर केले आहेत असे सांगितले. यावेळी मला न विचारता विषय कसे मंजूर केले असे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पुन्हा विचारले. याचा राग आल्यामुळे झालेल्या सभेबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याने नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी डॉ प्रतिभा शिंदे यांनी दि 26 मार्च 2021 व आजची सभा या दोन्ही सभा स्वतःच्या अधिकारामध्ये तहकूब करत असल्याचे सांगितले त्यांनी ऑन लाईन सभेतून सभात्याग(लेफ्ट) केला. यावेळी उपस्थित सदस्यांनी शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात आहे. अनेक रुग्ण घरच्या घरी विळीगीकरणात आहेत. उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेले रुग्णही घरीच वर्गीकरणात आहेत .अनेक नागरिकांची घरे छोटी आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव शहरांमध्ये वाढत आहे. त्यामुळे पालिकेने ज्ञानदीप हायस्कूल मध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे निश्चित केले आहे त्यामुळे ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत असे रुग्ण त्यांच्यावर उपचार झालेले आहेत व त्यांना चार दिवसानंतर घरी सोडण्यात आला आहे असे रुग्ण घरच्या घरी विलगीकरण आत आहेत अशा रुग्णांसाठी ही सेवा द्यायची आहे. शहरांमध्ये नागरिकांना जनजागृती करावयाची आहे त्यांच्यासाठी काही औषधे खरेदी करावयाचे आहेत. त्यासाठी आजची सभा तहकूब करू नये अशी विनंती प्रदीप चोरगे भारत खामकर दीपक ओसवाल चरण गायकवाड आदीं सदस्यांनी केली. मात्र नगराध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारांमध्ये मागील सभा झाली झालीच नाही तर मग ही सभा नको असे म्हणत स्वतःच्या अधिकारात आजची सभा रद्द केली. त्यामुळे उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली गोंधळ केला मात्र तहकूब झालेली सभा पुन्हा घेण्यास नगराध्यक्षांनी नकार दिला.
सत्ताधारी व विरोधकांतील योग्य समन्वयाअभावी
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित महत्वाची सभा रद्द झाल्याने शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचे पडसाद सामाजिक माध्यमावरील उमटले. सभा रद्द झाल्याने पालिकेच्या वतीने करोना संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात येणारी कामे आता कशी होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिकेची सभा नगराध्यक्षांनी आज आयोजित केली होती. या सभेमध्ये करोना प्रादुर्भाव रोखणे संदर्भात उपयोजना करणे, आवश्यक वैद्यकीय यंत्रसामुग्री साहित्य खरेदी करणे आणि अण्णाभाऊ साठे योजनेतील कामे मंजूर करणे आदी विकास कामासंदर्भात आवश्यक विषयावर आजच्या बैठकीत चर्चा होणार होती. शहरामध्ये नागरिकांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करणे. घरच्या घरी वर्गीकरणात असणाया रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सोयी व औषधांचे किट पुरविणे, स्वच्छ सर्वेक्षणाचा ओ डी एफ शहराचा दर्जा टिकवण्यासाठी उपाय योजना करणे, नदीपात्रात मिसळणाया दूषित पाण्यासंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर शुद्धीकरण प्रकल्प उभारणे आदी नागरिकांचे आरोग्याचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय आजच्या सभेपुढे चर्चेसाठी होते.तरीसुद्धा नगराध्यक्षांनी आजची बैठक स्वतःच्या अधिकारात तहकूब केली आहे. याबाबत मुख्याधिकार्यांना विचारले असता नगराध्यक्षा तथा पीठासन अधिकारी स्वतःच्या अधिकारात सभा तहकूब करू शकतात असे सांगितले. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत नव्याने सभाअध्यक्ष निवडून सभा निवडून उपनागराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्याची विनंती प्रशासनाने धुडकावली. यामुळे शहरातील करोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत डॉकटर असणाया नगराध्यक्षांना कोणतीही गांभीर्य नाही. त्यातही यासभेबाबत नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाकडून योग्य तो खुलासा जिल्हाधिकायांनी मागावा अन्यथा उद्या नगराध्यक्षा व प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पालिका कार्यालयात टाळे ठोकणार आहे.तसे निवेदन जिल्हाधिकार्यांना देत आहे. – अनिल सावंत उपनगराध्यक्ष, वाई
आजच्या पालिकेच्या सर्व साधारण सभेमध्ये दिनांक 26 मार्च 2019 च्या सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयावर उपनगराध्यक्ष व सन्माननीय सदस्य समाधानी नसल्यामुळे सदर सभेबाबत प्राधिकृत अधिकारी तथा सक्षम प्रशासकीय अधिकायाकडून सभे बाबत सविस्तर अहवाल घेऊन पुन्हा चर्चेसाठी ठेवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येईल.त्यामुळेव आजची सभाही तहकूब करण्यात आली असून दि 29 एप्रिल रोजी पुन्हा बैठक घेण्यात येईल.
– डॉ. प्रतिभा शिंदे,नगराध्यक्षा, वाई